Durga Devi Visarjan
Durga Devi VisarjanSaam tv

Durga Devi Visarjan: तलावात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू; दुर्गादेवी विसर्जनादरम्यान घटना

Bhandara News : तलावात बुडून २३ वर्षीय मुलाचा मृत्यू; दुर्गादेवी विसर्जनादरम्यान घटना
Published on

शुभम देशमुख 

भंडारा : नऊ दिवस नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आज दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात येत आहे. परंतु या विसर्जनावेळी २३ वर्षीय युवकाचा तलावात बुडून (Death) मृत्यू झाल्याची घटना (Bhandara) भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. (Live Marathi News)

Durga Devi Visarjan
Amravati News: अमरावतीची आरोग्य यंत्रणा कोलमडली: १३४५ आरोग्य सेविका बेमुदत संपावर

नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर दसरा होऊन आज अकराव्या दिवशी दुर्गीत्सव मंडळांकडून दुर्गादेवीचे विसर्जन केले जात आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील विसर्जन केले जात आहे. दरम्यान शारदा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना २३ वर्षीय चेतन देवराम नागोसे (रा. जैतपुर) या तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Durga Devi Visarjan
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू; शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला 

जैतपुर येथील शारदा उत्सव मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवात स्थापन केलेल्या शारदामातेच्या मुर्तीच्या विसर्जनासाठी गावाजवळील गावबोडी तलावात गेले होते. मंडळातील काही कार्यकर्ते तलावात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन नागोसे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच दिघोरी- मोठी पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com