Amravati News: अमरावतीची आरोग्य यंत्रणा कोलमडली: १३४५ आरोग्य सेविका बेमुदत संपावर

Amravati News : अमरावतीची आरोग्य यंत्रणा कोलमडली: १३४५ आरोग्य सेविका बेमुदत संपावर
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: मागील १७ वर्षांपासून कंत्राटी सेवेत काम करत असून सेवेमध्ये कायम करावे; या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील १३४५ कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आरोग्य सेविका व कर्मचारी संपावर गेल्याने मेळघाटसह (Amravati) अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. (Tajya Batmya)

Amravati News
Nashik News : आमदार, मंत्री आणि खासदार यांना गावबंदी; नाशिक जिल्ह्यात दीडशेपेक्षा जास्त गावांचा निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचार मागील १७ वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. या मानधनात आताच्या महागाईत मानधनाचा पैसा पुरत नाही. यामुळे सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसाठी (Aarogya Sevak) आरोग्य सेविका व कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारत संपावर गेले आहेत. अमरावती जिल्हा परिषद समोर त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Beed News: भयंकर! गुप्तधनासाठी नरबळी द्यायचा होता, भोंदूबाबानं बापाकडेच केली कुमारी मुलीची मागणी

आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करावे 

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये माता मृत्यू, बालमृत्यू कुपोषण यासारखे अनेक आरोग्याचे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण कंत्राटी आरोग्य सेविका संपावर गेल्याने मेळघाट मधील आरोग्य यंत्रणा सुद्धा ठप्प झाली आहे. त्यामुळे आम्हाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जे आश्वासन मागील अधिवेशनामध्ये दिल होते; ते आश्वासन पूर्ण करावे. तसेच आम्हाला सेवेमध्ये कायम करावे, अशी मागणी कंत्राटी आरोग्य सेविकांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहील; असा इशारा त्यांनी यावेळी शासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com