Beed News
Beed NewsSaam tv

Beed News : पुढील वर्षी जुन महिन्यातच भरपुर पाऊस; बिरोबाच्या यात्रेत होईकची भविष्यवाणी

Beed News : पुढील वर्षी जुन महिन्यातच भरपुर पाऊस; बिरोबाच्या यात्रेत होईकची भविष्यवाणी
Published on

बीड : पावसाचा अंदाज व्यक्त केले जातात. त्यानुसार बीड जिल्ह्यातील बिरोबाच्या यात्रेत प्रत्येक वर्षी होईक सांगण्याची प्रथा या गावात आहे. त्यानुसार आगामी काळाबाबत होईकची भविष्यवाणी वर्तविण्यात आली असून २०२४ च्या जून महिन्यातच भरपूर (Rain) पाऊस पडेल व पीके चांगली येवून शेतकरी समाधानी होईल; असे भाकीत (Beed) बीडच्या आष्टी तालुक्यातील धनगड गावात करण्यात आले आहे. (Maharashtra News)

Beed News
Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप

बीड जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यातील पाटण येथील श्री. बिरोबा देवस्थान धनगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालखीची मिरवणूक काढली जात असते. त्यानंतर होईक म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी सांगितली जाते. यामध्ये दिपावली मध्ये कुठे पाउस पडेल कुठे नाही. याचा अंदाज वर्तविला जात असतो. दरम्यान हे होईक ऐकण्यासाठी आवर्जून सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहत असून शेकडो वर्षाची परंपरा आहे. दोन दिवस होईक सांगण्याचा कार्यक्रम चालतो.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Narendra Modi Shirdi Visit : मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते आक्रमक, PM नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर बहिष्कार; काळ्या फिती लावून निषेध

कापसाला साडेनऊ हजारापर्यंत भाव 

 यावर्षीच्या दिवाळीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा देखील सांगण्यात आले आहे. पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर ज्वारी, गहू, हरभरा, पन्नास ते सत्तर टक्के पिक शेतकऱ्यांना होऊ शकते. तसेच (Cotton Price) कापसाचे भाव नऊ ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत जातील; असेही सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com