बीड - जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्यांच सत्र सुरू झालंय. शनिवारी केजच्या राजेगाव येथील 40 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्यानंतर काल रविवारी बीडच्या (Beed) पांढरी गावातील 55 वर्षीय शेतकऱ्याने, गळफास घेऊन जीवन संपवलंय. दादासाहेब बाबुराव वांढरे वय 55 असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Beed Latest News In Marathi)
आष्टी तालुक्यातील पांढरी येथील मयत दादासाहेब वांढरे यांच्याकडे 3 ते 4 एकर जमीन आहे. दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोबतच शासनाने देखील कुठलीच मदतीची घोषणा केली नाही. पिक विमा देखील मिळेल की नाही ? याची शाश्वती नाही. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? लोकांचं देणं पाणी कसं द्यायचं ? या विवंचनेत त्यांनी शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीय.
विशेष म्हणजे या पांढरी गावात कधी नव्हे ते दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, परिसरातील शेकडो एकर शेतामध्ये पाणीच पाणी झालंय. आणि यामुळे शेतातील उभ्या पिकांसह अनेकांच्या जमीनी वाहून गेल्या आहेत. यामुळे आता दिवाळी कशी साजरी करायची आणि रब्बीतील पिकं कशी अन कुठे घ्यायचे ? या विवेंचनेत अनेक शेतकरी आहेत. यातच दादासाहेब वांढरे यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यात निसर्ग संकटाने शेतकरी भरडला जात आहे. मात्र सरकार आणि सरकारमधील मंत्री हे केवळ राजकारणात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी पुरता हातबल झाला असून आत्महत्या सारखं टोकाचे पावले उचलत आहे. यामुळे मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना धीर आणि आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.