Farmer
FarmerSaam tv

शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज पुरवठा करा; शरद पवार यांना शेतकरी कृती समितीचे निवेदन

शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज पुरवठा करा; शरद पवार यांना शेतकरी कृती समितीचे निवेदन
Published on

चोपडा (जळगाव) : शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा. तसेच विजेच्‍या बिल संदर्भात शेतकरी कृती समिती शिष्टमंडळाने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. (jalgaon news Provide full time power supply to farmers later on sharad Pawar)

Farmer
St Strike Update: नंदूरबार जिल्ह्यातील सर्व कर्मचारी 18 एप्रिलपासून येणार कामावर

शेतकरी (Farmer) कृती समितीने दिलेल्‍या निवेदनात वीज मंडळ व ऊर्जामंत्री नेहमी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील विजबिलाच्या थकबाकीवर बोट ठेवतात. पण शेतकऱ्यांचे व्यथा कुणी जाणून घेत नाहीत. म्हणून आपण मुख्यमंत्री असताना जसे अश्वशक्तीवर आधारित बिल आकारणी व्हायची; तशी व्हावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली. यावेळी एस. बी. पाटील, रमेश सोनवणे, अजित पाटील, अजित जाधव, नारायण पाटील, ॲड. कुलदीप पाटील हजर होते.

महाराष्‍ट्रातच असे का?

आज १० अश्वशक्तीचा पंप असेल तर १२ अश्वशक्तीचे रोज पूर्णवेळ विजपंप वापरला असे गृहीत धरून वीजबिल आकारले जाते. त्यात भर म्हणून त्या फिडरवरील साऱ्या चोऱ्या त्यात समाविष्ट करण्यात येतात. त्यात स्थिर आकार, वहन चार्जेससोबत टॅक्स देखील आकारला जातो. असे कोणत्याही राज्यात घडत नाही. मग महाराष्ट्रात का? याची देखील माहिती दिली. सध्या सुरू असलेले कृषिपंपाचे लोडशेडींग थांबवण्याची सूचना सरकारला करण्याची देखील विनंती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com