नंदुरबार : महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार चारही आगारातील सर्व एसटी कर्मचारी 18 एप्रिलपासून कामावर हजर होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नंदुरबार आगारात झालेल्या बैठकीत एक मताने निर्णय घेण्यात आला. (nandurbar St Strike Update All employees in Nandurbar district will come to work from April 18)
एसटी कर्मचाऱ्यांच्या (St Strike) लढ्यासाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून विविध यासाठी लढा सुरूच राहणार आहे. मागील सहा महिने झाले एसटी कर्मचारी बिनपगारी न्याय हक्कासाठी लढा देत होते. विविध माध्यमातून आंदोलने व संप पुकारत शासनाविरुद्ध लढा दिला. न्याय मिळावा यासाठी निराशेपोटी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या (Suicide) देखील केल्या. उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आदेशानंतर शरद पवार यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला लागलेले वेगळे वळण व वकील गुणरत्न सदावर्ते यांना झालेली अटक अशा विविध घडामोडींमुळे नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारातील कर्मचाऱ्यानी लढा विलीनीकरणाच्या संपातून माघार घेत 18 एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने कामावर हजर राहून प्रवाशांना सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नंदुरबारसाठी कार्यकारणी
नंदुरबार आगारातर्फे लढा विलीनीकरण संघाच्या अध्यक्षपदी ललित प्रदीप सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी दिलीप गायकवाड, विलास तांबोळी, आतीक पठाण, सचिव रवींद्र बैरागी, फिरोज मंसूरी कार्याध्यक्ष सुनील पाटील, सचिन सूर्यवंशी, मुरली पगारे आदींची निवड करण्यात आली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.