आजीबाई करतेय कोळपणी, नांगरणी; कर्ता पुरूष नसल्‍याने ओढवली परिस्थिती

आजीबाई करतेय कोळपणी, नांगरणी; कर्ता पुरूष नसल्‍याने ओढविल परिस्थिती
Women Farming
Women Farming
Published On

वाकोद (जळगाव) : परिस्थिती माणसाला सर्व शिकवते असे म्हणतात. परंतु याचे प्रत्यक्ष उदाहरण कुंभारी तांडा येथील महिलेच्या रूपातुन त्यांच्या शेतात पहायला मिळाले. घराची जबाबदारी सांभाळेल असा एकही पुरूष नसून एकुलत्‍या एक मुलाच्‍या मृत्‍यूनंतर शेती कामाची सर्व जबाबदारी सत्‍तर वर्षीय महिला सांभाळत आहे. (jalgaon-news-kumbhartanda-village-no-man-family-and-women-farming-work)

कुंभारी तांडा येथील जाफरा नथु चव्हाण (वय ७०) या आपल्या सूना नातवंडासह राहत असून शेतीसोबतच घराची जबाबदारी अतिशय सक्षमपणे साभाळतांना दिसत आहे. घरातील कर्ता मुलगा वारल्याने तिच्यावर ही परिस्थिती ओढवली असून ती देखील या संकटाला सहज सामोरे जात आहे.

Women Farming
औरंगाबाद महापालिकेत काम कमी आणि भलताच उद्योग जास्त! सापडल्या दारूच्या बाटल्या

नांगरणी, कोळपणी अन्‌ फवारणीही करता स्‍वतः

कुंभारी तांडा येथील सत्तर वर्षीय महिलेला तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे स्वतः शेतीचा गाडा ओढावा लागत आहे. सत्तर वर्षीय महिलेच्या मेहनातीने शेतीची सर्व कामे ती स्वतः लीलया पार पडत असून अगदी यशस्वी शेती करीत आहे. या महिलेकडे अडीच एकर शेती असून त्यांचे शेत धरणाकाठी असल्याने मुबलक पाणी त्याठिकाणी आहे. शेतीची अगदी सुरवातीपासूनची सर्व कामे या महिला करतात. नांगरणी, कोळपणी असो की वखरणी, फवारणी विहीर खोदने बैल गाडी चालवणे अशा सर्व प्रकारची शेतीशी निगडीत सर्व कामे या जाफरा आज्जी करतांना दिसत आहे. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने या सत्तर वर्षीय महिला सर्व प्रकारच्या व्याधीपासून लांब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com