Cotton Price
Cotton PriceSaam tv

Cotton Price : कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस ठेवला घरातच; निम्मेहून अधिक जिनिंग उद्योग ठप्प

Jalgaon News : कापसाला यंदा प्रतिक्विंटल सुमारे सात ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव परवडत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत.
Published on

जळगाव : यंदा डिसेंबर महिना सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत. पण असं असलं तरी कापूस बाजारातली स्थिती फार चांगली नाही. कापसाला चांगला भाव मिळेल; या आशेवर शेतकरी आहेत. यामुळे कापूस घरात भरून ठेवला असून कापूस विकायला तयार नाहीत. परिणामी जिनिंग उद्योग देखील अद्याप ठप्प आहेत.

कापसाला यंदा प्रतिक्विंटल सुमारे सात ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव परवडत नसल्याने शेतकरी (Farmer) कापूस विकायला तयार नाहीत. त्यामुळे जिनिंग उद्योग ठप्प पडला आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर सुमारे दीडशे पैकी ७० ते ८० जिनिंग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. तर जे सुरू आहेत; ते देखील पूर्ण क्षमतेने सुरू नाही. दरवर्षी दिवाळीपासून कापसाचा हंगाम (Cotton Price) सुरू होतो. डिसेंबरपर्यंत खान्देशात सुमारे तीन ते साडेतीन लाख गाठींची खरेदी होते. पण यंदा तशी परिस्थिती नाही.

Cotton Price
Jalgaon News : रात्री वडिलांकडून पार्सल नेले अन् थोड्यावेळात आली मृत्यूची बातमी; दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाला मागणी नाही. बांगलादेश, व्हिएतनाम, चीन हे देश प्रामुख्याने भारताचा कापूस खरेदी करणारे देश आहेत. पण त्यांच्याकडूनही हवी तशी मागणी अद्याप होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. म्हणून कापसाची निर्यात ठप्प आहे. बांग्लादेशात राजकीय अराजकता माजली आहे. त्याचा व्यापारावर परिणाम झालाय. शिवाय भारताच्या अनेक व्यापाऱ्यांचे सौदेही अडकले आहेत. कापूस आयात करून जिनिंग चालवायच्या तर भरमसाठ इम्पोर्ट ड्युटी मुळे तेही शक्य नाही. अशा परिस्थितीत कापूस मार्केटमध्ये मंदी दिसून येत आहे.

Cotton Price
Ambarnath Accident : भीषण अपघात..भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

शिवाय उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा; अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज सीसीआय साडेसात हजार रुपयांचा भाव देत आहे. पण जाचक अटींमुळे शेतकरी तिकडे जायला तयार नाहीत. परिणामी शेतकरी कापूस विक्रीला न काढता घरातच भरून ठेवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com