Chalisgaon News : पीक पाहणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यासोबत घडले दुर्दैवी; शोध घेण्यासाठी गेलेल्या मुलाला बसला धक्का

Jalgaon News : शेतात फेरफटका मारत असतात ते शेतातील विहिरीजवळ गेले होते. यावेळी शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू
Chalisgaon News
Chalisgaon NewsSaam tv
Published On

चाळीसगाव (जळगाव) : पाऊस पडल्याने पिकांची परिस्थिती खराब झाली आहे. दरम्यान शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडली. शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली. 

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील वाघडू येथील शेतकरी साहेबराव भीमराव पाटील (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. साहेबराव पाटील हे २ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेतात फेरफटका मारत असतात ते शेतातील विहिरीजवळ गेले होते. यावेळी शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू (Death) झाला. यावेळी शेतात कोणीच नसल्याचे त्यांना मदत मिळाली नाही. 

Chalisgaon News
Raksha Khadse News : गिरीश महाजन- नाथाभाऊ एकत्र यावे हीच इच्छा, रक्षा खडसेंना असं का वाटलं? बघा VIDEO

मुलगा शेतात गेला असता आले उघडकीस 

शेतात गेलेले वडील अजून घरी आले नाही. म्हणून साहेबराव पाटील यांचा मुलगा त्यांना पाहण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत साहेबराव पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी बबनराव बाजीराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com