Raksha Khadse News : गिरीश महाजन- नाथाभाऊ एकत्र यावे हीच इच्छा, रक्षा खडसेंना असं का वाटलं? बघा VIDEO

Jalgaon News : भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र यावे ही इच्छा असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या. खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
Raksha Khadse
Raksha KhadseSaam tv
Published On

जळगाव : आजही माझी इच्छा आहे की गिरीश महाजन व नाथाभाऊ यांनी एकत्र आले पाहिजे. दोघांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम केल्यास नक्कीच चांगले राहील; असे मत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे. 

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रम अंतर्गत आयोजित मुल्याकंन शिबीराच्या उदघाटन निमित्ताने रक्षा खडसे या जळगावात (Jalgaon) आल्या होत्या. यावेळी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. तसेच एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे व्यक्तिगत मत ते चांगले मांडू शकतील; असेही त्या म्हणाल्या. 

Raksha Khadse
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा मोह नडला; ३० अर्ज भरल्याप्रकरणी पती- पत्नी ताब्यात

प्रवेशाबाबत लवकरच निर्णय 

लोकसभेच्या माझ्या विजयामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. केंद्राच्या नेत्यांकडून मला लोकसभेत सहकार्य करा, असं नाथाभाऊना सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी मदत देखील केली आहे. पण एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीचा असून याबाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील. पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय गेला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल; असे देखील (Raksha Khadse) रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com