महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही- अजित पवार

आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही- अजित पवार
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही- अजित पवारSaamTV
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत (debt waiver scheme in india) नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात दिली.

कोरोनामुळे (Corona) राज्याची तसेच देशाचीही परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाऊनमुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच अशी घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही- अजित पवार
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार?

तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitkar) यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली.

हे देखील पहा-

ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन निर्णय घेतले होते. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी‌ तर दोन लाखाच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या‌ कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या योजनेतंर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकर्‍यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करु अशी घोषणाही अजितदादा पवार यांनी यावेळी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com