31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार?

राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल (२३ डिसेंबर) टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार?
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार?Saam Tv
Published On

रामनाथ दवणे

मुंबई : राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल (२३ डिसेंबर) टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल त्यासोबाबतच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज (२४ डिसेंबर) नवी नियमावली जाहीर होणार आहेत.

दरम्यान, टास्क फोर्सच्या कालच्या बैठकीत काय झालं याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार,

  1. राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागु होणार आहे.

  2. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत

  3. आज दुपारपर्यंत राज्यशासन नवी नियमावली जाहिर करणार

  4. ३१ जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी

  5. फटाके फोडता येणार नाहीत , आतिषबाजी नाही

  6. लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध १०० जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा २०० होती

१) बंदीस्त जागेतील कार्यक्रम-

  1. समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांकरता 100 लोकांनाच परवानगी

  2. २५% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागु

  3. ओपन-- ५०% किंवा १००यामध्ये जी कमी ती मर्यादा लागु 100 लोकांनाच परवानगी

  4. रेस्टरंट- 50% क्षमतेनच सुरु राहणार. प्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल

२) मुंबईची स्थिती काय?

- ३ महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईक

- ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या ५५० -६०० होती.

- ३ महिन्यांनंतर रुग्णसंख्यावाढ बघायला मिळतेय.

- मुंबईत दरदिवसाला 45हजार टेस्टींग होत आहेत.

३) काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?

- जलद लसिकरण मोहिम

- बुस्टर डोस बाबत केंद्राकजे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा

- केंद्राकडे लहानमुलांच्या लसिकरणासाठी पाठपुरावा करावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com