Wheat MSP Price: मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; गव्हाच्या हमीभावात केली घसघशीत वाढ

Wheat MSP Price Increase: एकीकडे शंभू सीमेवर शेतकरी तळ ठोकून असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. गव्हाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे.
wheat msp price in india
wheat msp price in indiaSaam TV
Published On

Uttar Pradesh Government Wheat MSP Price Increase

शेतमालाला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसह देशभरातील शेतकरी संघटनांनी पुन्हा 'चलो दिल्ली'ची हाक दिली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर असलेल्या शंभू सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

wheat msp price in india
Gas Cylinder Price: मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, वाचा नवे दर...

एकीकडे शंभू सीमेवर शेतकरी तळ ठोकून असताना दुसरीकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने गव्हाच्या हमीभावात तब्बल १५० रुपयांची वाढ केली आहे. (Latest Marathi News)

आता यूपी सरकार शेतकऱ्यांकडून २ हजार २७५ रुपये प्रति क्विंटल दराने गहू खरेदी करणार आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजेच १ मार्चपासून लागू होणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सरकारकडून या एमएसपीवर गव्हाची खरेदी १ मार्च २०२४ ते १५ जून २०२४ पर्यंत केली जाणार आहे. मुख्यमंत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "प्रिय अन्नदाता शेतकरी बांधवांनो! उत्तर प्रदेश सरकारने २०२४-२५ मध्ये गव्हाची किमान आधारभूत किंमत २, हजार २७५ रुपये प्रति क्विंटल ठरवली आहे".

PFMS द्वारे गव्हाची किंमत ४८ तासांच्या आत थेट तुमच्या आधार लिंक खात्यात भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे". मला आनंद आहे की भाग पीक घेणारे शेतकरी देखील यावर्षी त्यांचा गहू नोंदणी करू शकतील आणि विकू शकतील. तुमच्या सर्वांची समृद्धी आणि कल्याण ही डबल इंजिन सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन!', असं मुख्यमंत्री योगींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी चलो दिल्लीचा नारा देत केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर असलेल्या शंभू सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्रीय नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, या बैठकीतून अद्याप तोडगा निघालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com