वर्धा : समुद्रपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Samudrapur APMC) गोडाऊनला अचानक लागलेल्या आगिमध्ये गोडाऊनमध्ये असलेला लाखो रूपयांचा बारदाना (Bardana Bags) जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. नाफेडच्या (NAFED) शासकीय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून हरभराखरेदी करता कृषी उत्पन्न बाजार समितीने बारदाना खरेदी केला होता व तो बारदाना येथील गोडाऊनमध्ये सुरक्षितरित्या ठेवला देखील होता.
हे देखील पहा :
मात्र, आज अचानक आग लागल्याने तो बारदाना जळून पूर्णपणे खाक झाला आहे. सदर बारदाण्याच्या एकुण ८० गाठी असल्याचे समजते व त्यांची अंदाजे किंमत जवळपास २५ ते ३० लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे तिथे काही प्रमाणात शिल्लक असलेला बारदाना सुद्धा जळून खाक झाला आहे. तसेच या आगीत इमारतीचे (Building) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
गोडाऊनला (Godown) लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले होते. तरी नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जवळच असलेले बोरवेल पाईप लावून नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच समुद्रपूर येथील नगरपंचायतचे पाण्याचे टँकर बोलावून आगीवर पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.