Onion Price Drop : कांद्याला कवडीमाेल भाव, शेतक-यांच्या डाेळ्यातून अश्रुंच्या धारा; हमीभावाची मागणी (पाहा व्हिडिओ)

सरकाराने शेतक-यांकडे दुर्लक्ष करु नये, त्यांना न्याय द्यावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
Onion Price, Solapur, Farmers
Onion Price, Solapur, FarmersSaam tv

Solapur News : मागील आठवड्यापासून कांद्याचे दर पडले (onion price drop) असून 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलो सरासरी कांद्याला भाव मिळत आहे. कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत आहे. कांदा उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. (Maharashtra News)

Onion Price, Solapur, Farmers
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

राज्यातील दोन नंबरचे कांद्याचे मोठं मार्केट म्हणून सोलापूर (solapur) बाजार समितीची ओळख आहे. त्यामुळे लांबून शेतकरी वर्ग कांदा विक्रीसाठी सोलापूरला येतात. मात्र मागील आठवड्यापासून कांद्याला 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलो सरासरी भाव मिळत आहे.

Onion Price, Solapur, Farmers
Vasantrao Kale Sugar Factory Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक: NCP च्या तिस-या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल, शरद पवारांच्या बैठकीकडे लक्ष

त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्च देखील मिळत नाहीये. त्या उलट पदरचे पैसे घालून शेतकऱ्याला घरी परतावं लागत आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्याची मागणी जोर धरत आहे. शेतक-यांना किमान 25 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com