

सागर निकवाडे
Nandurbar News: उत्तर महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. ही लागवड दोन पद्धतीने केली जाते. ती म्हणजे कोरडवाहू आणि बागायती. बागायती कापसाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. (Latest Marathi News)
तर कोरडवाहू कापसाची शेती पावसावर अवलंबून असते, वाढते तापमान आणि मागील वर्षी झालेल्या गुलाबी बोडंआळीचा प्रादुर्भाव या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांनी (Farmer) कापसाची लागवड करतांना दक्षता घेणं म्हत्वचे आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रमध्ये कापसाची (Cotton) लागवड होत आसते. मात्र शेतकऱ्यांनी कापूस लागवडी पूर्वी आपली शेती खोल नागरणी करून घ्यावी त्यामुळे जमिनीतील किडीच कोष नष्ट होतात. बागायती असेल सरी पद्धतीचा वापर करावा.
बागायती कापसाची लागवड करीत असताना तापमानात वाढ झाल्याने आणि पाणी पातळी कमी असल्यामुळे बागायती शेतकऱ्यांनी मे च्या शेवटच्या आठवड्या ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यास प्राधान्य द्यावे. कोरडवाहू असेल तर ५० मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर लागवडीला सुरवात करावी लागवड करताना काय काळजी घ्यावी असे देखील तज्ञांनी सांगितले आहे.
कापसाची लागवड करताना अनेक बाबी महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची बाब म्हणजे मागील हंगामात ज्या क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती, त्या क्षेत्रावर या वर्षी लागवड करू नये बोंडआळी नियत्रंण करण्यासाठी कमी कालवधीत येणारे कापसाचे वाण निवडावेत तसेच नॉन बीटी रेफ्युजी शेताच्या आजूबाजूला लागवड करावी. अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या मुळे बोंडआळीचे नियत्रण शक्य आहे ते जाणून घेऊ या...
कापसाच्या लागवडी पूर्वी खोलवर मशागत करून घ्यावी त्यामुळे आळ्याचे कोष नष्ट होतात.
तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने बागायती कापसाची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी.
बोडंअळीच्या नियंत्रणासाठी मागच्या वर्षी ज्या ठिकाणी कापसाची लागवड केली होती. त्या ठिकाणी लागवड करू नये.
शक्यतो शेतकऱ्यांनी कमी दिवसात उत्पन्न देणाऱ्या वाणाची लागवड करावी.
कापसाचे अधिकृत बी बियाणे वापरावे त्या सोबत दिलेलं नॉन बीटी बियाणे बांधाच्या आजूबाजूला लावावीत.
शक्यतो परिसीतील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी कापसाची लागवड करावी
एकूणच लहान मोठ्या गोष्टींचा विचार केल्यास आणि योग्य नियोजन केल्यास कापसावरील बोंड आळीचा आणि इतर बाबीपासून सुटकारा मिळू शकतो. मात्र गरज आहे ती फक्त योग्य खबरदारी घेण्याची
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.