द्राक्षांच्या भरघोस घडांवर निवडणुकीचा सूड; वैराग येथे 15 लाखांचे नुकसान

राजकीय वैमनस्यातून द्राक्ष बागेचं नुकसान केल्याचा शेतकऱ्याचा आरोप
Solapur News
Solapur Newsविश्वभुषण लिमये
Published On

सोलापूर - जिल्ह्यातील वैराग येथील शेतकरी (Farmer) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते इस्माईल पटेल यांची ढोराळे गावात अडीच एकरांची द्राक्ष बाग आहे. या द्राक्षांचे घड ऐन तोडणीला आलेले असताना अज्ञात इसमांनी बागेचे प्रचंड नुकसान केल आहे. पटेल यांच्या अडीच एकर शेतात माणिक चमन जातींचे द्राक्ष होती. पुढील आठवड्यात ही द्राक्ष (Grapes) विक्रीस जाणार होती.मात्र, त्या अगोदरच लाखोंच्या द्राक्षांचे अज्ञातांकडून नुकसान करण्यात आल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे.

हे देखील पहा -

नुकत्याच झालेल्या वैराग नगरपंचायत निवडणूक लढवण्यास इस्माईल पटेल यांचे भाऊ याकूब पटेल हे इच्छुक होते.पण त्यांना तिकीट नाकारले गेले. हाच राग डोक्यात ठेऊन अज्ञात इसमांनी 80 टक्के द्राक्ष बाग नेस्तनाबूत केली आहे असा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी पटेल यांनी केला आहे.याबाबत वैराग पोलीस ठाण्यात पटेल यांनी अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com