धुळे : केंद्रीय पथक अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात फिरत आहे. परंतु धुळे (Dhule) जिल्ह्यात पाहणी न करता मुक्कामाला आलेल्या या पथकाला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेराव घातला. तसेच निवेदन देखील दिले. (Breaking Marathi News)
नंदुरबार येथील पाहणी दौरा आटोपून धुळ्यात रात्री मुक्कामी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांना ठाकरे गट शिवसैनिकांनी घेराव घातला. त्यावेळी ठाकरे गट (Shiv Sena) शिवसैनिकांना ही माहिती मिळाली. या केंद्रीय पथकास ठाकरे गट शिवसैनिकांनी घेराव घालत धुळे जिल्ह्याची पाहणी का नाही? यासंदर्भात विचारणा केली. या केंद्रीय पथकातर्फे धुळे जिल्ह्यात पाहणी होणार नसून, पाहणी दौऱ्यात धुळे जिल्ह्याचा समावेशच नसल्याचे ठाकरे गट शिवसैनिकांना सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धुळे जिल्ह्याचाही समावेश करा
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा करीत असून हे पाहणी पथक धुळ्यात फक्त मुक्कामासाठी आले. धुळे जिल्ह्याचा समावेश नसल्याने याबाबत ठाकरे गट शिवसैनिकांनी धुळे जिल्ह्यात देखील अवकाळीमुळे नुकसान झाले असून धुळे जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश करावा; अशी मागणी या केंद्रीय पथकास ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.