Cotton Price
Cotton PriceSaam tv

Cotton Price: पांढऱ्या सोन्याचे भाव फुटले; शेतकऱ्याला मिळाला ७१०० दर

Dhule News : पांढऱ्या सोन्याचे भाव फुटले; शेतकऱ्याला मिळाला ७१०० दर
Published on

कापडणे (धुळे) : कापसाच्या बाजारात पूर्वहंगामी लागवड झालेल्या कापसाची खरेदी सुरू केली आहे. श्रावण एकादशीच्या मुहूर्तावर (Cotton Price) कापसाला प्रतिक्विंटल सात हजार शंभरचा भाव मिळाला. तर जुन्या कापसाला साडेसात हजारापर्यंत भाव मिळाला आहे. मात्र  दुष्काळी स्थितीत कापसाचे (Dhule) भाव दहा हजारी पार करतील, अशी शेतकऱ्याना अपेक्षा आहे. (Maharashtra News)

Cotton Price
Maratha Aarkshan : सरकारची अंत्ययात्रा काढत केला अंत्यविधी; बीडच्या नांदूरमध्ये मराठा समाज आक्रमक

धुळे तालुक्यासह जिल्ह्यात कपाशीचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी कापसाच्या भावात मोठी घसरण झाली होती. बऱ्याचशा शेतकऱ्यानी (Farmer) कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने मागील वर्षीचा कापूस विकलेला नाही. या वर्षी तरी भाव वाढतील म्हणून कापसाचे क्षेत्र वाढलेले आहे. पावसाअभावी कोरडवाहू क्षेत्र करपून गेले आहे. वाढ तर एक फुटापेक्षा अधिक झालेली नाही. बागायती कपाशीचे क्षेत्र बहरलेले आहे.

Cotton Price
Balasaheb Thorat News: चांगले सरकार मोडून सत्ता स्थापन करण्याची भाजपची निती: बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

व्यापाऱ्यांकडून सात हजारांवर भाव
बागायती कापसाची वेचणी सुरू झाली आहे. पूर्वहंगामी अर्ली व्हरायटीचा कापूस खरेदी करण्यासाठी इतर व्यापाऱ्यांनीही प्रतिक्विंटल साडेसहा हजारांचा भाव देत खरेदी सुरू केली आहे. या कापडाने येथे दहापेक्षा अधिक कापसाचे व्यापारी आहेत. त्यांनी खेडा पद्धतीने कापसाची खरेदी सुरू केली आहे. व्यापारी अरुण पाटील यांनी काटापूजन मुहूर्तावर प्रतिक्विंटल सात हजार शंभर रुपये याप्रमाणे कापसाची खरेदी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com