साडेतीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे बिल कोरे; तरीही ८०२ कोटींची थकबाकी

साडेतीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे बिल कोरे; तरीही ८०२ कोटींची थकबाकी
Farmer Light Bill
Farmer Light BillSaam tv
Published On

धुळे : कृषीपंपांच्या वीजबिलापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही तब्बल ८०२ कोटी रुपये सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी व सर्व चालू वीजबिल ३१ मार्चअखेर अदा केल्यास उर्वरित ५० टक्के अर्थात तब्बल ४०१ कोटी रुपये वीजबिल माफ होणार आहे; अशी माहिती महावितरण (Mahavitaran) कंपनीतर्फे देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. (dhule news bills of more than three and half thousand farmers are empty)

Farmer Light Bill
दुर्दैवी..पाचव्या मजल्यावरून पडला लिफ्टच्या खड्ड्यात; तरुणाचा मुत्यु

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या संकल्पनेतील महा कृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात कृषीपंपाच्या विजबिल थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

साडेतीन हजारावर वीजबिल कोरे

जिल्ह्यात आजपर्यंत ५२ हजार ४३९ शेतकऱ्यांनी (Farmer) चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम असे ३५ कोटी ८२ लाख रुपये भरून योजनेत सहभाग घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी चालू बिलांसह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांची उर्वरित ५० टक्के थकबाकीही संपूर्ण माफ होणार आहे. आत्तापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून (Dhule News) जिल्ह्यातील तीन हजार ६४३ शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९६ हजार ७५६ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण ४६० कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत.

साडेबारा कोटी विकास कामांवर

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या वसुलीतील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हा स्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आत्तापर्यंत जिल्ह्यात ३७ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यात प्रत्येकी १२ कोटी ५१ लाख रुपये निधी हा ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ५५१ कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे. सुधारित थकबाकीमध्ये आणखी ५० टक्के माफी मिळविण्याची संधी ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे. कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com