तबरेज शेख
नाशिक : शहरातील कॅन्सर रुग्णालयाच्या लिफ्टच्या खड्ड्यात पाचव्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची खबर मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात (Hospital) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (nashik news he fell from the fifth floor into the elevator pit Death of a young man)
नाशिकच्या (Nashik) मुंबई नाका येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत दिलेल्या कामानुसार लिफ्टचे काम सुरु होते. लिफ्टच्या दारावर पोस्टर चिपकवतांना अश्फाक शब्बीर नगीनेवाले (वय 25) हा तरुण लिफ्टच्या खड्यात खाली पडला. त्याला जबर मार लागून या घटनेत सदर तरुणाचा दुर्देवी मुत्यु (Accident Death) झाला आहे.
नातेवाईक संतप्त
मुंबई नाका पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई नाका पोलिस अधिक तपास करत आहे. घटनेची माहिती मिळताच मयत तरुणाच्या नातेवाईकांनी या घटनेला हॉस्पिटल प्रशासन जवाबदार असून जोपर्यंत हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; अशी भूमिका घेतली होती, मात्र पोलिस प्रशासनाकडून या घटनेबाबत कारवाईची व हॉस्पिटल प्रशासनकडून आर्थिक मदतीची, तसेच तरुणाच्या बायकोला नोकरी देन्याच आश्वासन देण्यात आले आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
एकूणच या घटनेनंतर एकच प्रश्न असा देखील उपस्थित होतो की, हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या दरवाजाला स्टिकर चिपकवण्यासाठी अशपक गेला तेव्हा लिफ्ट चौथ्या मजल्यावर हवी होती. मात्र लिफ्ट होती ती पहिल्या मजल्यावर त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे, पोलिसांनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी अशीच मागणी आता मयताचे नातेवाईक करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.