बालाजी सुरवसे
धाराशिव : नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी तुट भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची गरज असते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक वीमा काढावा, यासाठी शासनाने एक रुपयात पीक विमा भरण्याची योजना सुरू केली आहे. यात धाराशिव जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी रब्बीचा पीकविमा उतरवत पिके सुरक्षित केले आहेत.
नैसर्गीक आपत्ती गारपीट, दुष्काळ, अवकाळी पावसामध्ये पिकांचे नुकसान होते. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत येतात. शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान टाळण्यासाठी पीक विमा महत्त्वाचा आहे. खरीप हंगामानुसार रब्बी हंगामासाठी देखील पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी १४ डिसेंबरपर्यंत विमा काढण्याची मुदत होती. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी रब्बीचा पिक विमा भरला आहे.
निम्म तेरणा प्रकल्पातुन तीन टप्प्यात सोडणार पाणी
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्म तेरणा प्रकल्पातील पाणी उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे सोडण्यात येणार आहे. दरम्यान याचे वेळापत्रक निश्चीत करण्यात आले असुन रब्बी हंगामासाठी तीन टप्प्यात हे पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे जवळपास ३ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फायदा होणार आहे. दरम्यान रब्बी हंगाम सन २०२४-२५ करिता निम्म तेरणा डावा व उजवा कालव्याकरिता तीन पाळिका नियोजित आहेत. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घ्यावा. दोन दिवसात मागणी अर्ज करावा; अशी माहीती निम्म तेरणा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यवतमाळमध्ये अंतिम दिवशी 83 हजार शेतकऱ्यांनी भरला विमा
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, हरभरा, गहू या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मागील महिन्यापासून पिक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू होती. विमा भरण्याची शेवटच्या दिवशी ८३ हजार ५६४ शेतकऱ्यांनी एक लाख ३१ हजार हेक्टरवर पिक विमा उतरविला आहे. परंतु यंदा विमा कंपनीच्या अटीमुळे विमा भरण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.