Bhandara News : भंडारा जिल्ह्यात ७ कृषी केंद्रात बियाणे विक्री बंद; कृषी विभागाच्या भरारी पथकाची कार्यवाही

Bhandara News : कृषी केंद्रावरून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये; याकरिता कृषी विभाग सतर्क आहे
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : खरीप हंगामाला सुरवात झाली असून कृषी केंद्रात बियाणे, खत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे, खत उपलब्ध व्हावे; त्याकरिता भरारी पथक तयार करण्यात आली आहे. या भरारी पथकांकडून कृषी केंद्रांची तपासणी करत वेगवेगळ्या कारणांवरून सात कृषी केंद्रावरील बियाणे विक्री बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. 

Bhandara News
Pune Tragedy : एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू; ती काही मिनिटं आणि पती-पत्नी, मुलासोबत घडलं भयंकर

कृषी केंद्रावरून शेतकऱ्यांची (Farmer) फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये; याकरिता कृषी विभाग सतर्क आहे. या करिता कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक देखील केली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तपासणी सुरू असून यामध्ये आतापर्यंत १०० पेक्षा जास्त कृषी केंद्राची तपासणी झालेली आहे. 

Bhandara News
Water Smart Meter : संभाजीनगरातल्या ३ लाख नळांना बसणार स्मार्ट मीटर; जीवन प्राधिकरणाकडून कामाला सुरवात

तपासणी दरम्यान कृषी केंद्रामध्ये भाव फलक (Bhandara) दर्शनी भागात न लावणे, साठा रजिस्टर अद्यावत न ठेवणे, विक्रीसाठी उपलब्ध असलेले बियाणे कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यात समाविष्ठ नसणे, बिल बुकवर विक्री केलेल्या निविष्ठाची संपूर्ण माहिती नसणे, विक्रीसाठी उपलब्ध असलेले कंपनीची बियाणाचे सोर्स सर्टिफिकेट उपलब्ध नसणे, रासायनिक खत पोस मशीनवरून विक्री न करता ऑफलाईन विक्री करणे. इत्यादी त्रुटी तपासणी दरम्यान निदर्शनांस आले. त्यामुळे सात कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com