रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : पाण्याचा काटकसरीने वापर करणे याबाबत वारंवार आवाहन केले जात असते. मात्र आता घरोघरी नळ कनेक्शन देताना स्मार्ट मीटरची जोडणी केली जाणार आहे. जेणेकरून पाण्याचा वापर व्यवस्थित होऊ शकेल. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात ३ लाख नळांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहराची तहान भागवण्यासाठी जवळपास २४७० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत याद्वारे शहरात पाणी येईल अशी अपेक्षा आहे. या योजनेमार्फत प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे त्यासोबतच तीन लाख स्मार्ट मीटर देखील बसविण्यात येणार आहे. यामुळे जेवढे पाणी वापराल तेवढी पाणी पट्टी नागरिकांना (Water Supply) द्यावी लागणार आहे.
जलकुंभावरही बसणार एक मीटर
शहरात राबविण्यात येत असलेल्या या नवीन योजनेत यासंदर्भात निविदेची कागदपत्रे तयार करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू आहे. दरम्यान जलकुंभातून किती पाणी नागरिकांना दिले जात आहे. याचे मोजमाप करण्यासाठी देखील त्याला एक मीटर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.