Bogus Crop Insurance : बागा नाहीत तेथेही भरला फळपीक विमा; आष्टी तालुक्यात बोगस विमा भरल्याची माहिती समोर

Beed News : नैसर्गिक आपत्तीमध्ये फळबागांचे नुकसान होत असते. याला सुरक्षा कवच म्हणून फळपीक विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बागांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळते
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

बीड : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना व फळपीक विमा योजना राबविण्यात येत असते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो. मात्र या योजनेत बोगस विमा भरल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. यातच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बोगस फळपीक विमा भरल्याचे समोर आले आहे. याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. 

नैसर्गिक आपत्तीमध्ये फळबागांचे नुकसान होत असते. याला सुरक्षा कवच म्हणून फळपीक विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे. अर्थात नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे किंवा बागांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. याकरिता विमा सुरक्षा कवच कामी येत असते. मात्र यातच शेतकऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याचे आता समोर येत आहेत. अर्थात ज्याठिकाणी बागा नाहीत अशा ठिकाणी देखील फळ बाग दाखवून विमा उतरविण्यात आला आहे. 

Crop Insurance
Electric Shock : सोसायटीची मोटार सुरु करताना झाला घात; वॉचमनचा मृत्यू, सात तासांनंतर घटना उघडकीस

४० पैकी १८ अर्जच योग्य 

बोगस पिकविम्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता बीडच्या आष्टी तालुक्यात बोगस फळपिक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील केरुळ, कडा, धामणगाव, बिरंगुळवाडी या गावांतील ४० ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात, कृषी विभागाकडून फळपीक तपासणी करण्यात आली. यातील केवळ १८ योग्य अर्ज आढळले आहेत. तर काही ठिकाणी फळपीक बागाच आढळल्या नाहीत.

Crop Insurance
Panchayat Samiti Election : भंडारा जिल्ह्यातील चार पंचायत समितींवर महायुतीचा झेंडा; दोन समितींवर मविआची सत्ता

आता सर्वच बागांची होणार तपासणी 

ज्या जमिनीवर फळ बाग लावण्यात आलेल्या नाहीत अशा ठिकाणचा फळ पीक विमा उतरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळं आता कृषी विभागाकडून जिल्ह्यातील जितके फळ पीक विम्याचे अर्ज दाखल झाले आहेत. त्या सर्वच ठिकाणच्या फळबागांची तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आणखी किती बोगस फळपीक विमा समोर येतील हा पाहणे महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com