Electric Shock : सोसायटीची मोटार सुरु करताना झाला घात; वॉचमनचा मृत्यू, सात तासांनंतर घटना उघडकीस

Palghar News : नगरपरिषदद्वारा सोसायटीला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. दरम्यान रविवारी सोसायटीमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला यावेळी नळाला पाण्याचा फोर्स वाढवण्यासाठी मोटरला अवैध विद्युत जोडणी केली होती
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

पालघर : पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा जोरदार झटका बसल्याने वॉचमनचा मृत्यू झाला आहे. हि धक्कादायक घटना पालघर शहरातील टेंभोडे येथील श्रीपती सोसायटीमध्ये घडली आहे. मोटरला अवैध विद्युत जोडणी करत असताना विजेचा झटका लागून घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. 

नगरपरिषदद्वारा सोसायटीला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. दरम्यान रविवारी सोसायटीमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळी नळाला पाण्याचा फोर्स वाढवण्यासाठी मोटरला अवैध विद्युत जोडणी केली होती. सोसायटीतील वॉचमन कमल सौद हे मोटार जोडणी करण्यासाठी गेले. मोटरला विद्युत जोडणी करत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

Electric Shock
Malegaon Bajar Samiti Election : मालेगाव बाजार समितीत सत्ता पालट; ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाचा विजय

सात तासानंतर घटना आली उघडकीस 

विजेचा झटका लागल्यानंतर सात तासानंतर सोसायटीतील काही मुले खेळत असताना त्यांना वॉचमनचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. कमल सौद यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. यानंतर कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली.

Electric Shock
Fraud Case : लग्नाचे आमिष देत ३० महिलांची फसवणूक; मुंब्रा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  हि संपूर्ण घटना सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र सोसायटीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कमल सौद यांच्या कुटुंबीयांनि केला असून पालघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पालघर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com