Crop Insurance : बीड जिल्ह्यातील १२ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा; सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक अर्ज

Beed News : बीड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यातच १०० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. तर याच पेरणी झालेल्या पिकांचा आता शेतकऱ्यांकडून पीकविमा काढला
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

बीड : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी आता अवघा एकच दिवस बाकी राहिला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी तब्बल १२ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेऊन आपल्या पिकांना संरक्षण कवच दिले आहे. यात सर्वाधिक विमा अर्ज हे सोयाबीन पिकासाठी आहेत. 

Crop Insurance
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी १०० रुपयांमध्ये उघडणार खाते; धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार

बीड (Beed) जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यातच १०० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. तर याच पेरणी झालेल्या पिकांचा आता शेतकऱ्यांकडून पीकविमा काढला जात आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १२ लाख ७६ हजार ९५५ शेतकऱ्यांनी विविध पीकांच्या विम्यासाठी १२ लाख ७७ हजार ४८ अर्ज ऑनलाईन दाखल केले आहेत. यातून जिल्ह्यातील (Kharip Hangam) खरीपाचे ५ लाख ४९ हजार ४९१ हेक्टर पीक क्षेत्र विमा संरक्षीत झाले आहे. 

Crop Insurance
Buldhana Cyber Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाखात फसवणूक; सायबर पोलिसांनी संशयिताला गुजरातमधून केली अटक

दरम्यान उद्या १५ जुलै पर्यंत पिक विम्यासाठी (Crop Insurance) अर्ज सादर करता येणार आहेत. शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा भरता येत असला तरी राज्य शासनाने या सर्व शेतकऱ्यांसाठी ३१५ कोटी ९३ लाख ८ हजार १८४ रुपये भरले आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेऊन सोयाबीनच्या पीकविम्यासाठी सर्वाधिक ६ लाख ९३ हजार ५६५ अर्ज आले आहेत. तर कापसासाठी १ लाख ८१ हजार अर्ज सादर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com