Marathwada News : वर्षभरात मराठवाड्यातील ९४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

Beed News : शेतकरी मेहनत करून शेतातून उत्पन्न घेतो. शेती करताना बियाणे, खत खरेदीसाठी पैसा नसल्याने बँक, विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज किंवा खासगी व्यक्तींकडून हात उसणवारीने पैसे घेऊन जमिनीत लावतो
Marathwada Farmer
Marathwada FarmerSaam tv
Published On

बीड : कर्ज काढून शेतीसाठी खर्च केला जातो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. यामुळे कर्ज कसे फेडायचे याची विवंचना शेतकऱ्याला असते. यातूनच शेतकरी टोकाचा निर्णय घेत असतो. मराठवाड्यात हे प्रमाण अधिक असून मागील वर्षभरात मराठवाड्यातील ९४८ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांमधून आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

शेतकरी मेहनत करून शेतातून उत्पन्न घेत असतो. शेती करताना बियाणे खरेदी, खत खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने बँक, विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज किंवा खासगी व्यक्तींकडून हात उसणवारीने पैसे घेऊन जमिनीत लावत असतो. मात्र शेतकऱ्यांसमोर असणारे संकट म्हणजे सततची नापिकी, शेतीमालाला नसलेला योग्य भाव, नैसर्गिक संकट यातून शेतकरी कर्जबाजारी होत असतो. याशिवाय विविध समस्यांपुढे हतबल होऊन शेतकरी हा आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याचं समोर आले आहे. 

Marathwada Farmer
Nandurbar Zp School : आदिवासी विद्यार्थ्यांचे अफलातून टॅलेंट; नंदुरबारच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी लिहितात दोघा हातांनी

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र 

शेतकरी आत्महत्या संदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून समोर आली आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे शासन दरबारी असलेल्या नोंदीतून समोर आले आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षभरात म्हणजे  २०२४ या वर्षभरात तब्बल ९४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये सर्वात जास्त २०५ शेतकरी आत्महत्या या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.

Marathwada Farmer
Saam Impact : नंदुरबारमधील 'त्या' कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; अतिक्रमणवर नगरपालिकेचा हातोडा, साम टीव्हीच्या बातमीनंतर दणका

शेतकरी आत्महत्या थांबणार कधी?
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतो. दरम्यान यामुळे वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर उपाययोजना करणार का ? आणि बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे हे भेसूर वास्तव दूर करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com