Strawberry Farming : चिखलदऱ्यात केली जाते स्ट्रॉबेरीची शेती; सेंद्रिय पद्धतीतून लाखोंचे उत्पादन

Chikhaldara News : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील शेतकरी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीचे रोपटे आणून त्याची लागवड करत आहेत. चिखलदरा बाजूला मोथा गावात अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात
Strawberry Farming
Strawberry FarmingSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: विदर्भाचे नंदनवन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून अमरावती जिल्ह्यातील चिखलदराची ओळख आहे. येथील आदिवासी शेतकरी पारंपरिक शेती सोबतच आता स्ट्रॉबेरीची शेती करू लागले आहेत. शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. स्ट्रॉबेरीची शेती करत यातून लाखो रुपयांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सध्या हि शेती नक्कीच फायद्याची ठरत आहेत. 

आजही अनेक शेतकरी पारंपरिक शेती करत कापूस, मका, उडीद, मूग, ज्वारी याचे अधिक उत्पादन घेताना दिसून येतात. हि पारंपरिक शेती आता परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. अर्थात निसर्गाचा लहरीपणा याला प्रमुख कारण असून शेतातून माल काढल्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याचे यात आर्थिक नुकसान होत असते. यामुळे बहुतांश शेतकरी हे आता वेगवेगळे प्रयोग करून त्यात यशस्वी होत आहेत. 

Strawberry Farming
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट...

६ हजार रोपांची केली लागवड 

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील शेतकरी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीचे रोपटे आणून त्याची लागवड करत आहेत. चिखलदरा बाजूला मोथा गावात अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. यातील नारायण खडके यांनी मोठा गावाशेजारील अर्धा एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची ऑक्टोबर महिन्यात लागवड केली. या अर्धा एकरात जवळपास ६ हजार स्ट्रॉबेरीचे रोपटे लावली आहेत. याचे उत्पादन येण्यास आता सुरवात झाली आहे. 

Strawberry Farming
ATM Crime : एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; रक्कम निघाली नाही म्हणून मशीनच नेण्याचा प्रयत्न

दोन लाखांचा नफा 

अर्धा एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी त्यांना एक लाख रुपयाचा खर्च आला. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीतून आत्तापर्यंत त्यांना दोन लाखांचा नफा झाला. दरम्यान चिखलदरा येथे येणारे पर्यटक रस्त्यालगत असलेल्या स्ट्रॉबेरीच्या स्टॉलवर जाऊन सेंद्रिय पद्धतीची स्ट्रॉबेरी घेतात. या स्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com