ATM Crime : एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; रक्कम निघाली नाही म्हणून मशीनच नेण्याचा प्रयत्न

Buldhana News : खामगाव- नांदुरा रोड वर आयडीबीआय बँक शाखा सुटाळाची शाखा आहे. याच ठिकाणी बँक ग्रहकांकरिता एटीम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला
ATM Crime
ATM CrimeSaam tv
Published On

बुलढाणा : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम घेऊन चोरटे पसार होत असतात. तर काही ठिकाणी थेट एटीएम मशीनचा चोरून नेल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे खामगांव- नांदुरा रोड वरील सुटाला गावातील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अर्ध्यातच फसल्याने एटिम मशीन सोडून पसार झाल्याची घटना आज सकाळी खामगाव शहरातील सुटाळा गाव शिवारात उघडकीस आली आहे.

खामगाव- नांदुरा रोड वर आयडीबीआय बँक शाखा सुटाळाची शाखा आहे. याच ठिकाणी बँक ग्रहकांकरिता एटीम सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास सुनसान असल्याने चोरटयांनी याचा फायदा उचलत एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.  

ATM Crime
Sangli GBS : सांगलीत जीबीएसचा धोका वाढतोय; जिल्ह्यात रुग्ण संख्या पोहचली अकरावर

पैसे निघाले नाही म्हणून मशीनच चोरण्याचा प्रयत्न 

चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यानी सुरवातीला एटीम मशीन मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे निघत नसल्याने त्यांनी चक्क एटीम मशिनच चोरून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु या मशीनचे वजन जास्त असल्याने ती एटीएम मशीन उचलली न गेल्यामुळे एटीम मशीन बाहेरच सोडून चोरटे पसार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. 

ATM Crime
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट...

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु 

दरम्यान सकाळ एटीएम मशीन बाहेर पडल्याचे दिसून आल्याने सदरची माहिती आयडीबीआय बँकेचे अधिकारी यांना कळविण्यात आली. माही मिळताच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पोलिसाना माहिती दिली. यानंतर शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com