Bogus Seeds : अमरावती जिल्ह्यत १ लाख ३२ हजाराचे कपाशीचे बोगस बियाणे पकडले; दोघांना अटक

Amravati News : खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक शेतकरी मान्सूनपूर्व लागवड करण्यास लागला आहे. यामुळे कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांची गर्दी होत आहे
Bogus Seeds
Bogus Seeds Saam tv

अमर घटारे 

अमरावती : सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु असून बाजार कापसासह सर्व बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री केली जात असते. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात बोगस बियाणे आढळून आले असून कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

Bogus Seeds
Nandurbar News : पाणी नसल्यामुळे पिके वाया जाण्याच्या स्थितीत; शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकरी आक्रमक

खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक शेतकरी मान्सूनपूर्व लागवड करण्यास लागला आहे. यामुळे कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. दरम्यान बोगस बियाणे व जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाची नजर आहे. दरम्यान बोगस बियाणे वाहतूक केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार (Amravati) अमरावती- नागपूर महामार्गावर शेंदोळाजवळ कपाशीचे बोगस बियाणे वाहतूक करताना हि कारवाई करण्यात आली आहे. 

Bogus Seeds
Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित; ठाकरे गट आक्रमक

दोन जणांना घेतले ताब्यात 
कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे हि कारवाई केली असून साधारण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे बोगस बियाणांचे पाकीट जप्त करण्यात आले आहे. तर या कारवाईत दोन जणांना तिवसा पोलिसांनी अटक केली असून यामध्ये लिंक असलेल्या आरोपीचा तिवसा पोलीस शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com