शेतीवाटपावरून एकाच कुटुंबात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल...

हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
शेतीवाटपावरून एकाच कुटुंबात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल...
शेतीवाटपावरून एकाच कुटुंबात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल... विश्वभुषण लिमये
Published On

सोलापूर : सोलापुरातील बार्शी तालुक्यातील पिंपरी या गावात एकाच कुटुंबामध्ये शेतीवाटपावरून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरीतील बहाद्दूर पठाण यांनी त्यांच्याच कुटुंबातील ९ सदस्यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने वैराग पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणात दादासाहेब पठाण यांनी बहाद्दूर पठाण आणि अन्य दोघांविरुद्ध हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन दमदाटी दिल्याची फिर्याद दिल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 504,506,34 आणि शस्त्र अधिनियम कलम 4,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीवाटपावरून सुरु असणाऱ्या या कौटुंबिक वादामध्ये तलवारी दाखवण्यात येत असल्यामुळे पिंपरी परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण बघायला मिळतं आहे. पुढील तपास पोलीस नाईक एम. जे. पाडुळे हे करत आहेत.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com