हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांच्या (farmers) आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या ४ दिवसात २ अल्पभूधारक तरुण शेतकऱ्यांनी गळ्याला फास आवळत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेत सेनगाव तालुक्यातील म्हाळसापुर (Mhalsapur) येथील 27 वर्षीय किसन मळेकर तर कळमनुरी (Kalamanuri) तालुक्यातील लासिना गावच्या (village) 28 वर्षीय योगराज सोनुळे या तरुण शेतकऱ्यांचा (farmers) समावेश आहे. या दोघांच्या ही आत्महत्येचे प्रमुख कारण, नापिकी, बेरोजगारआणि आर्थिक नैराश्य असल्याचे पुढे आले आहे. (2 young farmers commit self slaughter by hanging Hingoli)
हे देखील पहा-
दरम्यान तेवढी भीषण स्थितीत असताना ही सरकारकडून (government) घोषित केलेली आर्थिक मदत अनेकांपर्यंत अद्याप देखील पोहचली नसल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 36 कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयातील महसूल विभागाकडून मिळाली आहे. माळेकर यांचा 11 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता, त्यांच्याकडे एकूण सात एकर शेती आहे. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकत असत.
मात्र, मागील काही दिवसांपासून शेतीतील नापिकीमुळे माळेकर हे चांगलेच हतबल झाले होते. शेतात पीक पाहणी करण्यासाठी माळेकर हे नेहमीच जात असत. त्याचप्रमाणे आजही शेताची पाहणी करून येतो, असे सांगून ते शेतात गेले. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहिले, तर माळेकर हे शेतातील झाडाला गळफास घेतलेल्यावस्थेत आढळून आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.