Share Market Fall: बाजार सुरू होताच Sensex 1458 अंकांनी कोसळला

देशांतर्गत शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
Share Market Fall: बाजार सुरू होताच Sensex 1458 अंकांनी कोसळला
Share Market Fall: बाजार सुरू होताच Sensex 1458 अंकांनी कोसळलाSaam Tv
Published On

देशांतर्गत शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. युक्रेन- रशिया युद्धाचे पडसाद शेअर बाजारामध्ये उमटल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. रशियाच्या (Russia) हल्ल्याने जगभरात शेअर बाजारामध्ये (Stock market) घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. मुंबई (Mumbai) शेअर बाजारात १४५८ अंकांनी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारात देखील ३८७ अंकांची घसरण झाली आहे. तर ICICI बँकेचे (bank) व शेअर्स उघडताच ४ टक्क्यांनी खाली आले आहेत. सर्व सेक्टोरियल इंडेक्स (Sectorial) घसरणीच्या लाल चिन्हामध्ये बुडले आहे. (The Sensex plunged 1458 points market opened)

हे देखील पहा-

देशांतर्गत शेअर बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळाले आहे. सेन्सेक्स (Sensex) १८१३ अंकांच्या जबरदस्त घसरणीसह ५५,४१८ वर उघडला आहे. तर निफ्टी ५१४ अंकांच्या घसरणीसह १६,५४८ वर उघडला आहे. शेअर मार्केटच्या प्री- ओपनिंग सेशनमध्ये आज बाजारामध्ये मोठी पडझड होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. प्री- ओपन सेशनमध्ये बीएसई (BSE) सेन्सेक्स १,८०० अंकांपेक्षा जास्त म्हणजे, ३.१५ टक्क्यांनी घसरलेला होता. NSE निफ्टीत देखील ५०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १३०० हून जास्त अंकांची घसरण झाली आहे. सकाळी बाजार उघडल्यावर सेन्सेक्स ५५,७५० अंकांच्या आसपास व्यवहार करत होता.

Share Market Fall: बाजार सुरू होताच Sensex 1458 अंकांनी कोसळला
Nitesh Rane: नितेश राणे म्हणतात...आता भगव्याची जबाबदारी आमची

निफ्टी ३५० हून जास्त अंकांनी घसरून १६,७०० च्या खाली आला होता. या अगोदर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारामध्ये चांगली उसळी बघायला मिळाली होती. मात्र संध्याकाळ पर्यंत बाजारात तेजी निवळल्याचे बघायला मिळाले होते. दिवसभराचा व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात होते. व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स ६८.६२ अंकांनी घसरून ५७,२३२.०६ अंकांवर होता. NSE निफ्टी देखील २८.९५ अंकांच्या घसरणीसह १७,०६३.२५ वर होता. अशाप्रकारे सलग सहाव्या दिवशी मोठ्या घसरणीसह बाजार बंद झाला आहे.

रशियाने युक्रेन विरोधामध्ये लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com