सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु आहे. घरोघरी मोदक बनवले जातात.
दरम्यान, तुम्ही सणासुदीचा गोडासोबत तिखट पदार्थदेखील बनवू शकतात. तुम्ही तिखटात मोदकांची झणझणीत आमटी बनवू शकतात.
सर्वात आदी तुम्हाला बेसन घ्यायचे आहेत. त्यात थोडं कणिक टाका. त्यानंतर त्यात मीठ आणि तिखट टाका.
या मिश्रणात पाणी टाकून पीठ मळून घ्या. त्याला तेल लावून थोडं बाहेर ठेवा.
यानंतर सारण बनवण्यासाठी सुक खोबरं, तीळ, धणे, पाकळ्या, शेंगदाण्याचा कूट, मीठ, तिखट, काळा मसाला एकत्र करावा.
यानंतर याचे सारण बनवा. त्यानंतर पीठाचे गोळे लाटून त्याला मोदकाचा आकार द्या. त्यात सारण टाका.
यानंतर रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी कांदे, सुकं खोबरं भाजून घ्या. त्यात लसूण, आलं, मिरच्या आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करा.
यानंतर एका भांड्यात तेल टाका. त्यात मोहरी, हिंग, तमालपत्र, हळद टाका. त्यानंतर त्यात वाटण टाका.
यानंतर तेल सूटेपर्यंत परतून घ्या. त्यात गरम पाणी, काळा मसाला आणि गरम मसाला टाका.
या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात मोदक सोडा. थोडा वेळ हे मिश्रण चांगलं शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.
Next: सुबक कळीदार तिळगुळाचे मोदक, नैवेद्य खाऊन गणपती होईल खुश