ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळी खाणे शारिरीक आरोग्यासाठी खुपच पौष्टिक आणि फायदेशीर मानलं जातं.
याचसोबत केळीची पाने आणि सालही त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
केळीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे ऑक्सीडेटिव स्ट्रेस आणि सेल्युसर डॅमेज कमी करण्यास मदत करतात.
सालींमध्ये असलेले हे अँटीऑक्सिडंट्स हानिकारक मॉलिक्यूल्सना न्यूट्रिलाइज करण्याचे काम करतात.
केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनाइड्स सारखे गुणधर्म असतात जे शरिरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
केळींच्या सालीमध्ये असणारे व्हिटॅमिन बी६, १२ आणि मॅग्नेशियम, पॉटेशियम त्वचेला निरोगी आणि पुरळमुक्त बनवतात.
केळीची साल फायबरने भरपूर असते ज्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही.
स्मूदी, चहा किंवा शिजवून तळून केलेले चिप्स, चटणी याप्रकारे तुम्ही केळीच्या सालीचे सेवन करू शकता.
केळीच्या पानांमध्ये जेवण शिजवा. पाने उकळवून काढा किंवा चहा करा. जेवाताना ताटाऐवजी केळीची पाने वापरा.