तांदळाची भाकर ही अनेकांच्या घरी बनवली जाते. तांदळाची भाकर ही चविष्ट असते याचसोबत बनवण्यासाठी सोपी असते.
तांदळाची भाकर बनवताना नेहमी ही ट्रिक वापरा.
तांदळाची भाकर बनवण्यासाठी सर्वात आधी तांदळाचे पीठ घ्या.
त्यात गरम पाणी टाका आणि पीठ छान मळून घ्या.
हे पीठ बराच वेळ मळून घ्या. जेणेकरुन पीठ छान मऊ होईल.
यानंतर पीठाचे लहान गोळे करुन त्याची भाकर थापून घ्या.
भाकर थापण्यासाठी खाली सुके पीठ लावा जेणेकरुन भाकर चिकटणार नाही.
यानंतर भाकर तव्यावर टाका. एका बाजूने त्याला पाणी लावून घ्या.
यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. भाकर छान भाजून होईपर्यंत तव्यावर राहू द्या.
कोणतीही भाकर करताना दोन्ही बाजूने फक्त एकदाच भाजायची असते. तुम्ही दोनदा भाकर उलटून भाजू नका.