गाविलगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात, मेलघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वसलेला एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्याने हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर त्याचे लष्करी महत्त्व कमी होत गेले.
या किल्ल्याची मजबूत तटबंदी, अनेक दरवाजे, बुरुज, तोफा आणि दगडी बांधकाम आजही लोकांना थक्क करतं. किल्ल्यावरील दिल्ली दरवाजा, परिपाठा दरवाजा, तलाव आणि इतर अवशेष त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात.
गाविलगड किल्ल्यापासून काही अंतरावर असलेले चिखलदरा हिल स्टेशन हे विदर्भातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून तिथलं थंड हवामान पर्यटकांना आकर्षित करतं. हरिकेन पॉईंट, सनसेट पॉईंट, मोजरी पॉईंट, पंचबोल पॉईंट आणि देवी पॉईंट इथल्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात चिखलदरा परिसरातील भीमकुंड धबधबा विशेष लोकप्रिय आहे. याशिवाय कालापानी धबधबा आणि प्रॉस्पेक्ट पॉईंट परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पावसाळ्यात लोकं येतात.
मुंबईहून रेल्वेने बडनेरा जंक्शन किंवा अमरावती याठिकाणी पोहोचून तिथून रस्त्याच्या मार्गाने चिखलदरा आणि पुढे गाविलगड किल्ल्यावर जाता येतं. मुंबईहून नागपूर किंवा अमरावतीकडे जाणाऱ्या बस तसंच खासगी गाडीनेही चिखलदरा गाठणं सोयीचे आहे. हे अंतर सुमारे ६६० ते ७०० किलोमीटर आहे.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ हवामान उत्तम असल्यामुळे किल्ला पाहण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो. पावसाळ्यात हिरवळ आणि धुक्यामुळे किल्ल्याचं सौंदर्य अधिक खुलतं. मात्र घसरडी वाट आणि दाट धुके असल्याने विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.
गाविलगड किल्ला हा विदर्भातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. कमी गर्दी, स्वच्छ वातावरण आणि सातपुडा पर्वतरांगांतील शांत परिसरामुळे याठिकाणी निवांत भटकंतीचा आनंद घेता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.