चायनीज आणि साउथ इंडियन पदार्थ हे सर्वांनाच आवडतात. जर तुम्हाला साउथ इंडियन आणि चायनीज पदार्थांचा फ्यूजन खायला दिलं तर अजूनच आवडेल.
तुम्ही घरीच चायनीज स्प्रिंग डोसा बनवू शकतात. चायनीज स्प्रिंग डोसा टेस्टी आणि मस्त लागतो.
सर्वात आधी तुम्हाला तांदूळ आणि उडीद भिजत घालायचे आहे. ६-७ तासांनी ते वाटून घेऊन डोसा पीठ तयार करायचे आहे.
यानंतर तुम्हाला गाजर, कोबी, शिमला मिरची, कांदा, कांद्याची पात बारीक चिरायची आहे.
यानंतर तुम्हाला एका कढईत तेल गरम करायचं आहे. त्यात आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.
यात गाजर, बीट, कांद्याची पात, कोबी या भाज्या छान परतून घ्या.
यानंतर त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर आणि मिरीपूड टाका. वरुन चवीनुसार मीठ टाका.
यानंतर नॉनस्टिक तव्यावर डोसा बॅटर पसरवून घ्या. त्यावर तेल किंवा बटर लावा.
यावर तुम्हाला तयार केलेलं चायनीज स्टफिंग टाकायचं आहे. डोसा चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या.
तुम्ही डोसा चटणी किंवा सांबरसोबत खाऊ शकता.
Next: डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेनं भिजतात? फक्त '१' गोष्ट करा, रात्रभर चपात्या राहतील ताज्या