Viral Accident Video: हेल्मेटमुळे जीव वाचला! सुसाट कारने तरुणाला चिरडले; पुढे जे घडलं ते.. थरकाप उडवणारा VIDEO

Viral Accident Video CCTV Footage: अवघ्या काही सेकंदात घडलेली ही घटना इतकी फारच भयानक आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
Viral Accident Video CCTV Footage:
Viral Accident Video CCTV Footage: Saamtv

वाहन चालवताना हेल्मेट वापरा, सुरक्षित प्रवास करा.. असा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. मात्र तरीही अनेकजण विनाहेल्मेट प्रवास करत असतात. परंतु हेल्मेट घालणं किती सुरक्षित आहे, याचीच प्रचिती आणणारा एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील घटना पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी अपघाताचे, मारामारीचे, भन्नाट डान्सचे व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. यामधील काही अपघाताचे व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्याचा थरकाप उडेल. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये एका दुचाकीस्वाराला कार चालकाने चिरडल्याचे दिसत आहे. मात्र दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याला कोणतीही इजा होत नाही अन् जीव वाचतो. अवघ्या काही सेकंदात घडलेली ही घटना इतकी फारच भयानक आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Viral Accident Video CCTV Footage:
Rahul Gandhi Speech : महिलांच्या खात्यात १ लाख रुपये जमा करणार; राहुल गांधींची सोलापुरात घोषणा

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक कारचालक थेट दुचाकीला धडक देतो. या धडकेत दुचाकीस्वार थेट कारच्या खाली सापडतो. अपघात झाल्याचे पाहताच घटनास्थळीचे लोक धावून येतात. कारचालकही घाबरुन बाहेर येतो. परंतु आश्चर्य म्हणजे कारने चिरडल्यानंतरही दुचाकीस्वार सुखरुपणे बाहेर येतो. त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी हेल्मेटमुळे जीव वाचल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी या व्हिडिओतून आपल्याला मोठा धडा मिळाला, असल्याचेही सांगितले आहे. अनेकांनी तरुणाचा जीव वाचल्याबद्दल देवाचेही आभार मानलेत.

Viral Accident Video CCTV Footage:
Sanjay Raut On PM Modi: आम्हाला जेलमध्ये टाकले आता तुमचा नंबर, संजय राऊतांचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com