
Shocking Video: लातूरच्या आर्वी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेवर भररस्त्यात गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार किरकोळ वादातून घडल्याचे समजत असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिकांमध्ये खळबळ उडवणारी ही घटना लातूर शहरात चर्चेचा विषय बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी परिसरात दोन महिलांमध्ये (Women Fight) किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की एका महिलेला उद्देशून दुसऱ्या महिलेने गाडी चालवत थेट तिच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने संबंधित महिला तात्काळ बाजूला झाली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये(Video) स्पष्टपणे दिसते की एक महिला गाडी चालवत येते आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेवर गाडी घालण्याचा प्रयत्न करते. ती महिला सावरत बाजूला होते, पण गाडीचा धक्का लागतोच. या प्रकारानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि स्थानिकांनी हस्तक्षेप करत दोघींना वेगळं केलं.
या दोघींमधील वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक माहितीवरून असे समजते की, काही दिवसांपासून या महिलांमध्ये भांडण सुरू होते. एका किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि याचा शेवट थेट जीवघेण्या हल्ल्यात झाला.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.