
SSC Exam: दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलाय का?व्हॉट्सअपला तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा, कारण, आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.
दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात, त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे,पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.नवीन शिक्षण (Education) धोरणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळालीय. त्यामुळे २०२३ च्या धोरणानुसार नवीन शिक्षण धोरण लागू झालंय,त्यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षा होणार नाही
एवढंच नाही तर फक्त आता १२ वीची बोर्ड परीक्षा होणार असा दावा मेसेजमध्ये केलाय. तसंच नर्सरीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण किती वर्षानुसार असेल हेदेखील सांगितलंय,त्यामुळे हा मेसेज पाहून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, कारण बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी पालक मुलांसाठी लाखो रुपये खर्च करतात. शाळेव्यतिरिक्त अधिकचे क्लासही लावतात. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे, यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली.याबाबत बोर्डाकडून अधिक माहिती मिळू शकते.आम्ही अधिक माहिती मिळवली असता, काय सत्य समोर आलं पाहुयात.
सरकारने असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले तर सरकार आधी माहिती देते,त्यामुळं आमच्या पडताळणीत दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला.
टीप : व्हायरल होत असलेल्या मॅसेजची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.