Viral Challenges: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे स्ट्रॉबेरी चॅलेंज आहे तरी काय? जाणून घ्या

Social Media Trends: सर्वच ट्रेंड करण्यासाठी स्पर्धा ही करतात. अशातच सध्या सोशल मीडियावर स्ट्रॉबेरी चॅलेंज अशा एक नवा ट्रेंड आला आहे.
Viral Challenges
Viral ChallengesSaam Digital
Published On

Strawberry Challenge On Social Media

सध्याच्या काळात लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर असतो. लहान वयातील मुलं सोशल मीडियातून बघितलेल्या गोष्टीचे मोठ्या प्रमाणात अनुकरण करत असतात. लहान मुलंच नाही तर मोठे देखील एखाद्या गोष्ट आवडली म्हणून त्या गोष्टीचे अनुकरण करतात.

मात्र काही काळापासुन सध्याच्या तरुणाईमध्ये एका गोष्टीचे फार वेड लागलेले आहे ते म्हणजे जर नवा ट्रेंडचे. जसा नवीन ट्रेंड सोशल मीडियावर येतो, तस सर्वच ट्रेंड करण्यासाठी स्पर्धा ही करतात. अशातच सध्या सोशल मीडियावर स्ट्रॉबेरी चॅलेंज अशा एक नवा ट्रेंड आला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेव्हा सोशल मीडिया एखादी नवीन गोष्ट येते आणि ती कधी ट्रेंड बनून जाते ते समजत नाही. जेव्हा ट्रेंड बनतो तेव्हा त्याचे अनुकरण फक्त मोजक्या परिसरात होत नाही तर संपूर्ण देशात त्याचे अनुकरण होईला लागते. कधी कधी ट्रेंडच्या नादात काही व्यक्तींचे जीव ही जातात तर काहीं गंभीर परिस्थित सापडतात. मात्र सध्या संपूर्ण जगभर स्ट्रॉबेरी चॅलेंजची चर्चा होत आहे.नेमकं काय आहे स्ट्रॉबेरी चॅलेंज पाहूयात.

नेमकं काय आहे स्ट्रॉबेरी चॅलेंज?

स्ट्रॉबेरी चॅलेंजची सुरुवात नेमकी चीनमधून झाली आहे. चीनमधील तरुणांनी या ट्रेंडची सुरुवात केली आणि हळू हळू जगभर याची चर्चा होऊ लागली. या स्ट्रॉबेरी चॅलेंजमध्ये तरुणांनी स्ट्रॉबेरी खाण्याची स्पर्धा सुरु केली आहे.हे फक्त स्ट्रॉबेरी खाण्याचे सर्वसाधारण चॅलेंज नसून यात स्ट्रॉबेरी दातानी खायची नसुन फक्ता ओठांनी खावून दाखवायची आहे.

सध्या सोशल मीडियावर फक्त स्ट्रॉबेरी चॅलेंजची चर्चा सुरु आहे तसेच अनेक नेटकरी हे स्ट्रॉबेरी चॅलेंज करुन पाहत आहेत.नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट प्रतिक्रिया या ट्रेंडवर केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com