Viral Video
Viral VideoSaam Tv

Groom Viral Video : नवरदेवाची एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींच्या माना झाल्या वर, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही व्हाल आवाक्

Viral Video: लग्न हे प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकजण लग्नात काहीतरी स्पेशल गोष्टी करतात. आजकाल लग्नात काहीतरी स्पेशल आणि हटके एन्ट्री घेण्याची क्रेझ सुरू आहे. त्यासाठी अनेकजण रथ, घोडा किंवा अगदी बैलगाडीतूनदेखील एन्ट्री घेतात.
Published on

Wedding Groom Entry Viral Video:

लग्न हे प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकजण लग्नात काहीतरी स्पेशल गोष्टी करतात. आजकाल लग्नात काहीतरी स्पेशल आणि हटके एन्ट्री घेण्याची क्रेझ आहे. त्यासाठी अनेकजण रथ, घोडा किंवा अगदी बैलगाडीतूनदेखील एन्ट्री घेतात. मात्र, एक नवरदेवाने चक्क जेसीबीमधूनच लग्नमंडपात एन्ट्री घेतली आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In marathi)

लग्न म्हटलं की नवरा-नवरी वेगवेगळ्या अंदाजात एन्ट्री घेतात. अनेकदा डान्स करत, गाणी गात नवरा नवरी एन्ट्री घेतात. तसेच गावाकडे अनेकदा घोडा, रथ किंवा बैलगाडीतून नवऱ्याची मिरवणूक काढली जाते. परंतु आता नवऱ्याचे चक्क जेसीबीवरुन एन्ट्री घेतली आहे.

व्हायरल व्हिडिओत एका ओपन ग्राउंडवर लग्नसोहळा आयोजित केला आहे. या लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवऱ्याची एन्ट्री. लग्नमंडपात नवऱ्याने चक्क जेसीबीवरुन एन्ट्री घेतली आहे. जेसीबीच्या वर चढून नवरदेव लग्नमंडपात आला आहे. नवऱ्याने एन्ट्री घेताच उपस्खिक नातेवाईक अगदी आश्चर्याने बघत होते.

Viral Video
Telangana: तेलंगणा पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनीला केसांनी ओढले, व्हायरल VIDEO पाहून नागरिकांचा संताप

@ck_official_555 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. घोडा,रथ आणि आता जेसीबी, नवऱ्याची हटके स्टाईल, वऱ्हाडी मंडळी तर आश्चर्यचकितच झालेत अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहे.

Viral Video
Accident CCTV Footage : ३ ट्रक आणि कारचा विचित्र अपघात, ट्रक पुलावरुन खाली कोसळला; चौघांचा मृत्यू, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com