Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

woman falls while boarding moving train Itarsi : ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडल्यानं महिलेचे दोन्ही पाय मोडले. तर तिच्या हातातील बाळ बचावले. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
ट्रेनमध्ये चढताना महिला थेट फलाटाच्या गॅपमध्ये पडली, दोन्ही पाय तुटले
Woman fell from trainsaam tv
Published On

मध्य प्रदेशातील नर्मदापुरममधील इटारसी रेल्वे स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. फलाटावरून सुटलेल्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल गेला आणि ती थेट ट्रेन-फलाटाच्या मधोमध पडली. महिलेचे दोन्ही पाय तुटले. तिच्या पायांवरून ट्रेनचे चाक गेले. तिच्या हातातील बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.

तीन वर्षांचं मूल कडेवर घेऊन महिला फलाटावरून सुटलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिचा हात सुटला आणि तोल जाऊन ती थेट फलाट आणि ट्रेनच्या फटीमधून खाली पडली. ट्रेनचे चाक तिच्या दोन्ही पायांवरून गेले. यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले. सुदैवाने तिचं बाळ बचावलं. रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत तिला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना मध्य प्रदेशातील नर्मदापुरमच्या इटारसी जंक्शनवर घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित प्रवासी महिला फलाटावर उभी होती. तिच्या कडेवर तीन वर्षांचं बाळ होतं. इतक्यात फलाटावर आलेली ट्रेन सुटली होती. ट्रेनचा वेग वाढत होता. त्याचवेळी घाईघाईनं ती महिला कडेवर बाळ घेऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. ट्रेनच्या दरवाजातील हँडलला तिनं पकडलं. पण हात निसटला आणि तिचा तोल जाऊन ती फलाट आणि ट्रेनच्या गॅपमधून खाली पडली. या भीषण अपघातात तिचे दोन्ही पाय तुटले.

महिलेच्या हातातील बाळ या अपघातातून बचावले. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही महिला जबलपूरच्या बिलपुरा मडाई येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. ती कमलापती-अधारताल इंटरसिटी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास ट्रेन इटारसीला पोहोचली. ट्रेन सुटल्याचं फलाटावर उभ्या असलेल्या या महिलेनं बघितलं. ती घाईघाईने धावत गेली. कडेवर तीन वर्षांचं बाळ होतं. ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला.

ट्रेनमध्ये चढताना महिला थेट फलाटाच्या गॅपमध्ये पडली, दोन्ही पाय तुटले
Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

फलाटावर गोंधळ उडाल्याचं समजताच ट्रेनमधील प्रवाशांनी साखळी ओढली आणि ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांनी स्टेशनवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिला आणि तिच्या मुलाला रुळांवरून बाहेर काढले. रुग्णवाहिकेची वाट न बघता गंभीर जखमी झालेल्या महिलेला रिक्षामधून सरकारी रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे दोन्ही पाय तुटले आहेत. तर मुलाच्या पाठिला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com