Lady Police Viral Video: कहरच! सुंदर महिला पोलिसाला पाहून तरुणाचा प्रताप; भररस्त्यात केल किस अन्...पाहा व्हिडिओ

Boy Kissed Lady Policeman Video: तरुणाची समजूत काढणे महिला पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे...
Boy Kissed Lady Policeman Video
Boy Kissed Lady Policeman VideoSaamtv
Published On: 

Man kissed Police Viral Video: सोशल मीडियावर रोज आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडिओ कधी आश्चर्याचा धक्का देणारे असतात असतात, तर कधी पोट धरुन हसायला लावतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तरुणाने पोलिस महिलेसोबत केलेले कृत्य पाहून तुम्हीही चकित व्हाल. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू...

Boy Kissed Lady Policeman Video
Shiv Sena News : Uddhav Thackeray गट शिंदे गटासोबत जाणार आणि चक्क BJP ला पाठिंबा देणार?

पोलिसांचे (Police) नाव ऐकलं की भल्याभल्यांची तंतरते. पोलिसांचे नाव ऐकताच प्रत्येकालाच भिती वाटते. कारण पोलिस म्हणजे कठोर, शिस्तप्रिय आणि रागीट व्यक्ती.. अशीच काहीशी प्रतिमा प्रत्येकाच्या मनात तयार झालेली असते. मात्र प्रत्यक्षात पोलिसही हळवे असतात, प्रेमळ असतात अशी प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला पोलिस एका तरुणाला समजावताना दिसत आहे. हा तरुण अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत असून व्हिडिओमधील महिला पोलिस त्याला धीर देत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तिचा हाच चांगुलपणा त्या तरुणाच्या एका कृतीने चांगलाच अंगलाट येतो, जो पाहून सगळेच थक्क होतात... (Viral Video)

Boy Kissed Lady Policeman Video
Dhule News: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेख; कंपनी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

या व्हिडिओमधील महिला पोलिस तरुणाची समजूत काढत असतानाच अचानक भावूक होवून त्याला आलिंगन देते. मात्र याच संधीचा फायदा घेत या तरुणाने थेट पोलिसालाच किस केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या तरुणाची अचानक केलेली संतापजनक कृती पाहून महिला पोलिसालाही धक्का बसतो.

भररस्त्यात तरुणाचा हा प्रताप पाहून येणारे जाणारेही चकित झाले. अनेकजण त्याचा हा धीटपणा पाहून चकित झाले तर काही जणांनी या तरुणाची चांगलीच धुलाई झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.. (Latest Marathi News)

@Sanscari_ladka या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या महिला पोलिस अधिकाऱ्याचे कौतुक केले आहे तर काही जणांनी तरुणाला चांगलीच शिक्षा करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ बांग्लादेशमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.