Viral Video: मालकाने पाळीव कुत्र्यासाठी खरेदी केली 14 लाखांची बॅग, लोकं म्हणताहेत नशीब असावे तर कुत्र्यासारखे

Viral News: सध्या सोशल मीडियावर एका मालकाने आपल्या कुत्र्यासाठी खरेदी केलेल्या लाखो रुपयांच्या बॅगची चर्चा होत आहे.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर सध्या एक बातमी चांगलीच चर्चेत आहे. एका भारतीय सीईओने आपल्या पाळीव कुत्र्यासाठी तब्बल 14 लाख रुपयांचे लुई विटॉनचे महागडे अॅक्सेसरी खरेदी केल्याचे समोर आले आहे. या महागड्या खरेदीने लोकांना आश्चर्यचकीत केले असून इंटरनेटवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या व्हायरल(Viral) झालेल्या या बातमीनुसार, भारतीय स्टार्टअपच्या महिला सीईओने आपल्या पाळीव कुत्र्यासाठी एक लुई विटॉन कंपनीचे बॉलर बॅग खरेदी केले आहे. या बॅगची किंमत भारतीय रुपयांमध्ये 14 लाख आहे. लुई विटॉन ही जगातील सर्वात महागड्या ब्रँड्सपैकी एक असून तिचे प्रोडक्ट्स सामान्यतः उच्चभ्रू वर्गामध्ये लोकप्रिय(popular) आहेत. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीने त्याच्या मुलीला याच कंपनीची 2.5 लाख रूपयाची एक बॅग खरेदी करून दिली असल्याचे सांगितले होते. त्याच्यासाठी ही रक्कम फार जास्त असल्याचेही तो म्हणाला.

इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस

ही बातमी समजताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांनी या खरेदीला "विलासी जीवनशैलीचे प्रतीक" म्हणून संबोधले, तर काहींनी ती अनावश्यक खर्च असल्याची टीका केली. "इतकी रक्कम कुठे कुठे उपयोगी पडली असती," असे मत काहींनी व्यक्त केले. तर, काही लोकांनी या सीईओच्या पाळीव प्राण्यावरील प्रेमाचे कौतुक केले.

विलासी जीवनशैलीची चर्चा

या घटनेमुळे पुन्हा एकदा भारतातील उच्चभ्रू वर्गाच्या विलासी जीवनशैलीवर चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांना अशा खरेदीतून सामाजिक आणि आर्थिक असमानतेचा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. तर, दुसरीकडे, काही लोकांचा असा विचार आहे की ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, त्यांना आपली आवड जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. पाळीव प्राण्यांवरील प्रेमाची वाढती लोकप्रियता यावरून दिसून येते.

सध्या अनेक जण आपल्या पाळीव प्राण्यांसाठी महागडी उत्पादने खरेदी करताना दिसतात. पाळीव प्राण्यांसाठी महागडी खेळणी, फॅन्सी कपडे आणि विलासी वस्तू घेण्याची प्रवृत्ती प्रगत देशांमध्ये प्रचलित असून ती भारतातही झपाट्याने वाढत आहे. या चर्चेने पुन्हा एकदा समाजातील विविध स्तरांवरील विचारसरणीवर प्रकाश टाकला आहे. अशा प्रकारच्या विलासी खरेदी भविष्यात कशा प्रकारच्या चर्चांना तोंड फोडतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Viral Video: खरा मुंबईकर! वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी काढला हटके मार्ग; VIDEO होतोय तूफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com