Viral Video: आधी तू गप्प राहा...मेट्रोत महिलांचा जोरदार राडा; VIDEO पाहून तुम्हीच ठरवा चूक कोणाची?

Metro Viral Video: सोशल मीडियावर सध्या मेट्रोत झालेल्या महिलांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरत आहे,चुक कोणाची ते पहा.
Metro Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Women Fight In Metro: लोकल ट्रेनमधील वाद-विवाद आणि हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर कायम चर्चेच येत असतात.त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल ट्रेनच नाही तर मेट्रोमध्येही महिलांमध्ये जागा पकडण्यावरुन तुफान भांडण होत असतात.अशातच एका मेट्रोमधील महिलांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे.दरम्यान यात नक्की चुक कोणाची आहे हे व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral) झालेले आहे,ज्यामुळे दिल्ली मेट्रो असो वा मुंबई मेट्रो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की,मेट्रोमधून अनेक प्रवासी प्रवास करत आहेत.काही वेळात मेट्रोत असलेल्या दोन महिलांमध्ये जागच्या कारणावरुन वाद सुरु होतात.

मात्र त्यातील काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली महिला समोरच्या महिलेशी नंतर वाद करणे बंद करते,मात्र दुसरी महिला शेवटपर्यंत तिच्याशी वाद घालत असते.व्हिडिओच्या शेवटला पाहू शकता की काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या महिलेच्या बाजूने एक पुरुष येतो आणि समोरच्या महिलेला शांत बसण्यास सांगत असतो,मात्र ती महिला काही शांत बसत नव्हती.

मेट्रोमधील हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरील ''kakde_property_mh20''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की मुंबई मेट्रोचा आहे का दिल्ली मेट्रोचा आहे हे कळाले नाही,मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे.व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''नुसते वाद''तर अजून एका यूजरने लिहिले आहे,''काय गरज ऐवढी वाद घालण्याची''तर अनेकांनी शांत राहिलेल्या महिलेचे खूप कौतुक केलेले आहे.ऐवढेच नाही तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केलेला आहे.

टीप : मेट्रोमधील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Metro Viral Video
Viral Video: एका सेल्फीसाठी १०० रूपये घेतेय रशियन महिला, व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com