Viral Video: वाह गुरु! गणित शिकवण्याचा शिक्षकाचा अनोखा फंडा; असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसेल

Viral News: अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय आवडत नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या शिक्षकाच व्हिडिओ पाहून तुम्हाला ही नक्की गणित या विषयाची आवड निर्माम होईल.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

शाळा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आवडता काळ आहे. शाळेतील प्रत्येकाच्या अनेक आठवणी असतात. कधी शिक्षक आणि विद्यार्थ्याचे अभ्यासावरुन वाद असतील तर मित्रा-मित्रांची हाणामारी. शाळेतील प्रत्येक गोष्ट खास असते मात्र एक शाळेतील एक गोष्ट ही प्रत्येकाच्या न आवडती असते. ती म्हणजे गणित विषयाचा अभ्यास. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी गणित विषयाचा अभ्यास करावासा वाटेल. ज्या व्हिडिओत एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना गणित विषयाची रुची निर्माण होण्यासाठी काय केलं ते तुम्ही व्हिडिओत पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका शाळेतील वर्ग खोली दिसत आहे. या वर्ग खोलीत एक सफेद रंगाचा फळा आहे. त्यावर गणिताची काही सुत्र आणि एक आकृती रेखाटलेली आहे. फळाच्या समोर निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेले गुरुजी आहेत. व्हिडिओ(Video) जसा सुरु होतो, तसे ते गुरुजी फळ्यावर रेखाटलेल्या आकृतीची एका गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ओळख करुन देत आहेत. जर व्हिडिओतील शिक्षकांनी तयार करुन गायलेले गाणे ऐकले तर तुम्हाला एका हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याची नक्कीच आठवण येईल.

गणिताच्या शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ ''@ArunSinghdeoria'' या एक्स पेजवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''त्यांनी कुमार विश्वास यांना मागे सोडले'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

एक्सवर व्हिडिओ ४ ऑक्टोबर रोजी पोस्ट केला असून त्यानंतर व्हिडिओ तब्बल ४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओला पसंती मिळत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आमच्या वेळेस असे शिक्षक कुठे होते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com