Viral Video: अति आत्मविश्वास नडला! जिममध्ये 165 किलो वजन उचलताना घडलं भयंकर, पत्नीमुळे जीव वाचला!

Gym Accident Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होच आहे.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ जीममध्ये जाणाऱ्या प्रत्येकाने नक्की एकदा पाहावाच असा आहे.
Gym Accident Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Gym Video: सोशल मीडियावर कायम जगभरात घडत असलेल्या धक्कादायक घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातील बऱ्याच घटना वाहन अपघातांच्या असतात तर काही घटना व्यक्तींच्या हलगरजीपणामुळे घडलेल्या असतात.सध्या अशीच काहीशी घटना घडलेली आहे,जिथे जिममध्ये गेलेल्या व्यक्तीला व्यायाम करताना अति आत्मविश्वास नडला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला जिम दिसत आहे.काही वेळात तिथे नवरा-बायको येताना दिसून येत आहेत.मात्र तो व्यक्ती पॉवरलिफ्टिंग करण्यासाठी जातो आणि अतिशय वजनाचा रॉड उचलताना दिसत आहे.व्हिडिओत पुढे पाहिले तर रॉड उचलण्यासाठी त्याची पत्नी त्याला मदत करते मात्र काही वेळात त्याच्या हातातील रॉडचे वजन सहन न झाल्याने त्याच्या गळ्यावरच तो रॉड पडला जातो,मात्र त्याची पत्नी जवळ असल्याने तिच्या मदतीने त्याचा जीव बचावला जातो.सर्व धक्कादायक प्रसंग जिममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

जिममध्ये घडलेला सर्व धक्कादायक(Shocking) प्रसंग सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सच्या @Madan_Chikna या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हायरल होत असलेली घटना कुठल्या शहरातील आहे हे आतापर्यंत समजू शकलेले नाही मात्र आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात येत आहे.

जीममधील घटना इतकी थरारक होती की,व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक यूजर्संनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''नशीब वाचला'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''आभार मान देवा बायकोचे कायम'' तर काही यूजर्संनी संताप व्यक्त केला आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप:जिममधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Gym Accident Video
Shocking Video: अरे देवा...! काकू भजनात व्यस्त, तो दबक्या पावलाने आला अन् खिडकीतून.... , Viral Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com